Gold-Silver Rate Updates: ‘सोना ले जा रे आणि चांदी ले जा रे’, मौल्यवान धातूचे दर कोसळले, नवे दर पाहून व्हाल चकीत…
Gold and Silver New Rate: सोने आणि चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम होऊन घरगुती मागणी घटल्याने सोने आणि चांदीचे दर वेगाने घसरले आहेत.

जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि घरगुती मागणीतील सुस्त वातावरणाने मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. राजधानी दिल्लीतील सराफाबाजारात दोन्ही मौल्यवान धातूत 2 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ज्वेलरी खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चांदीच्या दरात 5,000 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण पाहायला मिळाली आहे.त्यामुळे चांदी 2,50,000 रुपये प्रती किलोवरुन घसरुन 2,45,000 रुपये प्रति किलोग्रॅम (सर्व करा सहित) वर आली आहे.औद्योगिक आणि गुंतवणूकीतील मागणी घसरल्याने चांदीवर दबाव वाढला आहे.

सोन्याच्या किंमतीतही घसरण नोंदली गेली आहे. 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे दर 2,200 रुपये प्रती 10 ग्रॅम घसरुन 1,57,000 रुपये प्रती 10 ग्रॅम वर पोहचले आहेत. गेल्या कामकाजाच्या वेळी हे सोन्याचे दर 1,59,200 रुपये प्रती 10 ग्रॅमवर बंद झाले होते.म्हणजे सोन्यात 1.4 टक्के घसरण झाली आहे.

घसरणीचे कारण :कमोडीटी तज्ज्ञांच्या मते आशियाई बाजारात सुट्टीच्या कारण ट्रेडिंग व्हॉल्युम कमी राहिले. ज्यामुळे लिक्विडीटी घटली. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा नरम महागाई दराच्या आकड्यांमुळे फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे.यामुळे डॉलरमध्ये चढ-उतार झाल्याने सोने आणि चांदीची मागणी कमकुवत झाली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पॉट सिल्वर सुमारे 2 टक्क्याहून जास्त घसरुन सुमारे 74.96 डॉलर प्रती औंस दरावर आली. तर स्पॉट गोल्ड देखील सुमारे 1 टक्क्यांवरुन कोसळून सुमारे 4,938 डॉलर प्रती औंसावर कामकाज करताना दिसला. अमेरिका आणि इराण यांचा संभाव्य करार आणि इतर जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदार सर्तक आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमजोर पडली आहे.