Todays Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर उतरले, सराफ बाजारात चांदीच्या सर्वात मोठी घसरण

Todays Gold Rate: आज सराफ बाजारातील सोने आणि चांदीचे दर समोर आले आहेत. दोन्हीचे भाव चांगलेच उतरले असल्याचे समोर आले आहेत. आजचा 10 ग्रॅमचा सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती जाणून घ्या....

| Updated on: Jan 30, 2026 | 4:36 PM
1 / 5
राजा-महाराजांच्या काळापासून सोने हा धातू अतिशय मौल्यवान समजला जातो. पूर्वीच्या काळात तर राज घराण्याच्या लोकांच्या अंगावर वस्त्रांपासून सर्व दागिन्यांपर्यंत सोन्याचे असायचे. आजही भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला तितकेच महत्त्व दिले जाते. पण वाढलेले सोन्याचे भाव येत्या काळात आकाशाला स्पर्श करणार असल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती...

2 / 5
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

3 / 5
जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 10 हजार तर चांदीचे दर 30 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

4 / 5
आजचे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर तर चांदीचे दर 3 लाख 72 हजार 860 रुपयांवर आले आहेत. सोन्या चांदीच्या दरात काल विक्रमी वाढ झाल्यानंतर आज मोठी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)