जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, आता 200 दिवसांपर्यंत…

Jio Recharge : जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असते. कंपनीने आता आपल्या युजर्ससाठी एक खास रिचार्ज सादर केला आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 18, 2026 | 3:28 PM
1 / 5
प्लॅनची किंमत: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 2025 रुपयांचा एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्यामुळे ग्राहकांचे दरमहा रिचार्ज करण्याचे टेन्शन मिटणार आहे.

प्लॅनची किंमत: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 2025 रुपयांचा एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्यामुळे ग्राहकांचे दरमहा रिचार्ज करण्याचे टेन्शन मिटणार आहे.

2 / 5

वैधता (Validity): या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 200 दिवसांची दीर्घकालीन वैधता मिळते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.

3 / 5

डेटा : या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. संपूर्ण वैधतेच्या कालावधीत ग्राहकांना एकूण 500 GB डेटा वापरता येईल. दररोज जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा खास प्लॅन असणार आहे.

4 / 5

कॉलिंग सुविधा: ग्राहकांसाठी कोणत्याही नेटवर्कवर (लोकल आणि एसटीडी) अमर्यादित (Unlimited) मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 फ्री मेसेज देखील मिळतात.

5 / 5

कोणासाठी फायदेशीर: ज्यांना वर्षभराचा प्लॅन महाग वाटतो आणि महिन्याभराचा प्लॅन वारंवार संपतो, अशा लोकांसाठी हा 6 महिन्यांपेक्षा जास्त वैधता असलेला प्लॅन उत्तम पर्याय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us