
अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 15 व्या वर्षापासून सुनीता, गोविंदासोबत आहे. दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. असं सुनीता हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सुनीता हिच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. पण गोविंदाच्या आईने दोघांच्या नात्याला मान्यता दिली होती. लग्न झालं होतं तेव्हा, तो मोठ्या कुटुंबासोबत राहत होता..

गोविंदाच्या आईने त्याला सांगितलं होतं, 'जर तू सुनीताला सोडशील तेव्हा बघ तू भिकारी होशील...' असं सुनीता हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे .

सांगायचं झालं तर, कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत सुनीता हिने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्याचे दुसऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध, फसवणूक, दुखावणे यांसारखे आरोप केले आहे.

यावर गोविंदा याने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण गेल्या अनेक महिन्यांपासून दोघे वेगळे राहतात.,. असं वक्तव्य खुद्द सुनीता हिने केलं होतं. शिवाय गोविंदासोबत असलेल्या नात्यावर सुनीता अनेकदा व्यक्त झाली आहे.