Govinda: सुनीताला कोणीतरी… गोविंदाचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाला?
Govinda: बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता अहूजाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता गोविंदाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार गोविंदा हा चांगलाच चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता गोविंदाने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता गोविंदा नेमकं काय म्हणाला वाचा...
नुकताच गोविंदाने सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने, सुनीताला कोणीतरी माझ्याविरोधात भडकवून देण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण आहे? याचा उल्लेख गोविंदाने केलेला नाही.
पुढे गोविंदा म्हणाला की, त्याला सुनीताला सर्वांसमोर लाजिरवाणे करायचे नव्हते. गोविंदाने सुनीताला आपल्या आयुष्यातील लकी चार्म असेही म्हटले आहे. आता सुनीता यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गोविंदा आणि सुनीता यांच्या खासगी आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. गोविंदा कथित गर्लफ्रेंड कोमल रानी स्वर्णकारसोबत अनेक ठिकाणी दिसला होता. ते पाहून सुनीताला राग अनावर झाला होता.
सुनीताने अनेकदा गोविंदावर सडकून टीका केली आहे. गोविंदा आणि कोमल एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते एकत्र येत आहेत की खरंच त्यांच्यामध्ये काही नाते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.