
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं वैवाहिक नातं पुन्हा एकदा चर्चेत आहे. चर्चा आहे की, सुनीताने गोविंदापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. कपल वेगळे होणार असल्याची बातमी आगी सारखी पसरलीय. पण दोघांपैकी आतापर्यंत कोणी या बातम्यांवर रिएक्ट केलेलं नाही.

हिंदुस्थान टाइम्स सोबत बोलताना गोविंदा-सुनीताची मुलगी टीना आहुजाने आपल्या आई-वडिलांच्या नात्याच सत्य सांगितलं.

इंटरव्यू दरम्यान टीनाला तिचे पालक गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या व्हायरल बातम्यांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने ही वृत्त पूर्णपणे निराधार, चुकीची असल्याच सांगितलं.

टीन बोलली की, या अफवा आहेत. मी अशा अफवांवर लक्ष देत नाही. टीनाला पुढे विचारलं की, अशा व्हायरल बातम्यांशी तुले पालक कसे डील करतात? त्यावर तिने उत्तर दिलं की, माझे वडिल आता भारतामध्ये नाहीत.

आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना टीना पुढे म्हणाली की, "मी खूप स्वत:ला ब्लेस्ड फील करते. माझ्याकडे इतकं चांगलं कुटुंब आहे. आम्हाला मीडिया, फॅन्स आणि आमच्या चाहत्यांकडून जितकं प्रेम, सपोर्ट मिळतय त्यासाठी मी त्यांची आभारी आहे"