PHOTO | निराशाजनक कामगिरीनंतरही मॅक्सवेलला संधी, इंग्लंडचा माजी खेळाडू हैराण

| Updated on: Oct 13, 2020 | 1:32 AM

ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. (graeme swann reaction to Glenn Maxwell's performance)

1 / 5
किंग्जस इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय.  मॅक्सवेलला यानंतरही  प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत असल्याने इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान हैराण झाला आहे, स्वानने स्टार स्पोर्ट्सवर एका विशेष कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं.

2 / 5
पंजाबने मॅक्सवेलसाठी मोठी रक्कम मोजली आहे. मात्र त्यानुसार मॅक्सवेलला दमदार खेळ करता येत नाहीये. मॅक्सवेल हा एक स्टार खेळाडू आहे. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी  इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तशीच कामगिरी पंजाबसाठी करायला हवी, असं स्वान म्हणाला.

3 / 5
कोलकाताविरुद्धात रविवारी 11 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात मॅक्सवेल पंजाबला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. या अटीतटीच्या सामन्यात पंजाबचा अवघ्या 2 धावांनी पराभव झाला.

4 / 5
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 7 सामन्यात मॅक्सवेलने अनुक्रमे 1, 5, 13, 11, 11*, 7 आणि 10* धावा केल्या आहेत.

5 / 5
दरम्यान पंजाबचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये आठव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे.