Photo Gallery | कुलगुरू हातात झाडू घेतात तेव्हा…!

| Updated on: Feb 23, 2022 | 1:07 PM

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात ग्रीन कॅम्पस उपक्रमाला सुरुवात करण्यात आलीय. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेता विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी श्रमदान करून विद्यापीठ परिसर हरित व सुंदर करत आहेत. कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनीही स्वतः हातात झाडू घेत या उपक्रमात सहभाग घेतला.

1 / 6
‘ग्रीन कॅम्पस’ उपक्रमात आरोग्य विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे.

2 / 6
विद्यापीठात कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणे, सौरउर्जेचा वापर असे प्रयोग केले जातायत.

3 / 6
आरोग्य विद्यापीठात जलसंधारण, प्राणी व पक्षांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्यात येणार आहे.

4 / 6
विद्यापीठाचे कुलसचिव  डॉ. कालिदास चव्हाण यांनीही हाती झाडू घेत परिसराची साफसफाई केली.

5 / 6
विद्यापीठातील 600 अधिकारी व कर्मचारी श्रमदान करत आहेत. त्यामुळे परिसर कात टाकणार आहे.

6 / 6
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘ग्रीन कॅम्पस’मध्ये कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी श्रमदान केले.