गुजरातकडे वेगाने सरकतंय Cyclone Biparjoy; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; 74 हजार जणांचं स्थलांतर; NDRF ची पथकंही तैनात

Gujrat Cyclone Biparjoy Live Status : चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार, आतापर्यंत 74 हजार नागरिकांचं स्थलांतर; प्रशासन सतर्क

| Updated on: Jun 15, 2023 | 9:39 AM
1 / 5
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

2 / 5
बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 74 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर NDRF ची 33 पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

3 / 5
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मंगरोळमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम जाणवायला लागला आहे. समुद्राचं पाणी किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळत आहे.

4 / 5
'बिपरजॉय' चक्रीवादळ आज संध्याकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धडकणार आहे. याचसोबत कच्छ, सौराष्ट्र क्षेत्र, मांडवी तट आणि पाकिस्तानमधील कराची बंदराला हे चक्रीवादळ धडकणार आहे.

5 / 5
बिपरजॉय हे चक्रीवादळ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ आहे. बिपरजॉयचं स्वरुप तीव्र असल्याने अधिक नुकसानीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे