मैत्रिणीचा संसार मोडून बिझनेसमनशी केलं लग्न; 3 वर्षांतच अभिनेत्री पतीपासून विभक्त?

'कोई मिल गया' या चित्रपटात झळकलेली बालकलाकार आठवतेय का? तिचं नाव हंसिका मोटवानी असून तीन वर्षांपूर्वी तिने तिच्याच एका मैत्रिणीच्या पूर्व पतीशी लग्न केलं होतं. आता तिच्या संसारात खटके उडाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Jul 21, 2025 | 8:21 AM
1 / 5
अभिनेत्री हंसिका मोटवानीने 4 डिसेंबर 2022 रोजी बिझनेसमन सोहेल खतुरियाशी लग्न केलं होतं. जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या तीन वर्षांतच हंसिका आणि सोहेल वेगवेगळे राहत असल्याचं समजतंय.

2 / 5
'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, हंसिका तिच्या आईसोबत राहतेय, तर सोहेल त्याच्या आईवडिलांसोबत वेगळा राहतोय. लग्नानंतर हंसिका तिच्या सासू-सासऱ्यांसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. परंतु त्यांच्यासोबत हंसिकाचं पटत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर हंसिका आणि सोहेल त्याच इमारतीत दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहू लागले होते.

3 / 5
वेगळं राहिल्यानंतरही या दोघांमधील भांडणं कमी झाली नाहीत. अखेर हंसिका तिचं घर सोडून आईसोबत राहायला गेली. याप्रकरणी अद्याप हंसिकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

4 / 5
या चर्चांवर हंसिकाचा पती सोहेलने प्रतिक्रिया दिली आहे. "असं काही नाही", असं त्रोटक उत्तर त्याने दिलं. परंतु हंसिका आणि तो वेगळे राहत आहेत का, याबाबत त्याने काहीच स्पष्ट केलं नाही.

5 / 5
हंसिकाने तिच्या खास मैत्रिणीच्याच पूर्व पतीशी लग्न केल्याचं म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर ती मैत्रीणि सोहेलच्या पहिल्या लग्नात हंसिका उपस्थित होती, अशीही चर्चा होती.