Happy Birthday Imtiaz Ali : स्वप्न होते बॉलीवूडमध्ये अभिनेता बनायचे पण झाले निर्माता-दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा अनोखा प्रवास

| Updated on: Jun 16, 2022 | 12:20 PM

इम्तियाज अलीने बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आले होते. पण ते अपूर्णच राहिले. अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटात त्यांनी याकुब मेननची भूमिका साकारली असली तरी अभिनयाची पकडत्यांना जमली नाही.

1 / 9
बॉलीवूडमधील  'जब वी मेट', 'लव्ह आज कल', 'हायवे', 'रॉकस्टार' सारखे दिग्गज चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक आणि लेखक इम्तियाज अली यांचा आज वाढदिवस आहे.

2 / 9
इम्तियाज अली यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण बिहारमधील  पाटणा येथील सेंट झेवियर्समधून केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते जमशेदपूरला आले. येथे इम्तियाज त्याच्या मावशीकडे राहत होते.  त्यांच्या  घराजवळ एक थिएटर होते, ते  अनेकदा चित्रपट पाहायला जात असत . इथूनच त्यांची सिनेमा आणि नाटकाची आवड वाढली.

3 / 9
इम्तियाज अली यांनी स्वत: जमशेदपूरमध्ये नाट्यसृष्टी सुरू केली. नाटकातून उरलेल्या काळात पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले आणि दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले.

4 / 9
जमशेदपूरमध्ये  थिएटर करत असतानाच आपली स्वप्न पूर्ण  करण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत राहून इम्तियाजने झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा कोर्स केला आहे.

5 / 9
2005 मध्ये, दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'सोचा ना था' रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभय देओल आणि आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसले होते.त्यानंतर 2006 मध्ये  त्यांच्या  'आहिस्ता आहिस्ता' या चित्रपटालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण 2007 मध्ये आलेल्या जब वी मेटने इम्तियाज अलीचे नशीब बदलले.

6 / 9
यानंतर इम्तियाज अलीने 'रॉकस्टार', 'हॅरी मेट सेजल', 'हायवे' आणि 'लव्ह आज कल' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

7 / 9
इम्तियाज अलीने बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आले होते. पण ते अपूर्णच राहिले. अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटात त्यांनी याकुब मेननची भूमिका साकारली असली तरी अभिनयाची पकडत्यांना  जमली नाही.

इम्तियाज अलीने बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आले होते. पण ते अपूर्णच राहिले. अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटात त्यांनी याकुब मेननची भूमिका साकारली असली तरी अभिनयाची पकडत्यांना जमली नाही.

8 / 9
बिहारमधील दरभंगा येथील असलेले इम्तियाजने मुंबईत स्वत:चा ठसा उमटवलाआहे. त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ जमशेदपूरमध्ये गेला आहे. चित्रपटात करिअर करण्याची दिशाही तिथूनच मिळाली.

9 / 9
बॉलीवूडमध्ये एका पेक्षा एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक इम्तियाज अली आज ओटीटीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सक्रिय असलेले पाहायला मिळतात.