Padma Awards List : पद्म पुरस्कारांची घोषणा; 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला, समाज सेवा, उद्योग, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि खेळ अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात आलं आहे. ज्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, अशा व्यक्तींना राष्ट्रपती भवनात आयोजित खास कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
पाच जणांना पद्म विभूषण
धर्मेंद्र सिंह देओल – अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
केटी थॉमसन – केटी थॉमसन यांना देखील पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, सार्वजनिक व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एन राजम – एन राजम यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे.
पी नारायण – साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पी नारायण यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
व्ही एस अच्युतानंदन – व्ही एस अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूष पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मभूषण पुरस्कार
अलका याज्ञिक, भगतसिंग कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, मामूट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, पियुष पांडे, एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर.गणेश, उदय कोटक, व्ही.के. मल्होत्रा, वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन
पद्मश्री पुरस्कार
भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
चरण हेमब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)
रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)
अंके गौडा (कर्नाटक)
आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मांडलेवाला (गुजरात)
आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
युनाम जात्रा सिंग (मणिपूर)
बुधरी थाठी (छत्तीसगड)
डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)
डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)
हेले वॉर (मेघालय)
इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
के. पंजनिवेल (पुडुचेरी)
कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (आसाम)
पोकिला लेकटेपी (आसाम)
आर. कृष्णन (तामिळनाडू)
एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)
तागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधू (बिहार)
धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)
भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
