Padma Awards 2026 : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
Dharmendra : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरनोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर तेरा जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. वर्ष 2026 साठी 131 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश आहे आणि यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील 6 व्यक्ती आणि मरणोत्तर 16 पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मेंद्र सिंह देओल हे भारतीय कला आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या योगदानाने भारतीय चित्रपटसृष्टीला आकार दिला आणि अनेक दशके प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पाडला. त्यांचे 24 नोव्हेबरला निधन झाले होते.
अलका याग्निक यांना पद्मभूषण
पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा पुरस्कार अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. हा पुरस्कार धर्मेंद्र सिंह देओल यांच्या कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाचे महत्त्व अधोरेखित करतो. सरकारच्या या निर्णयाचे कला आणि चित्रपट जगतात मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. या सन्मानाकडे त्यांच्या वारशाच्या आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाच्या चिरंतन स्मृतीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या सह गायिका अलका याग्निक यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
धर्मेंद्र 6 दशक होते कार्यरत
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या आता त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
