Ambadas Danve | शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एका ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव मधील शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेतृत्वावरचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एका ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव मधील शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेतृत्वावरचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे भाष्य करत म्हणाले, शिवसेना हा पक्ष नसून ती गद्दारांची टोळी आहे, आणि ही टोळी भारतीय जनता पार्टी चालवते. ही टोळी म्हणजे भाजपचं खेळणं आहे त्यामुळे जेवढं चालवायचं तेवढं ते चालवतात असं दानवे म्हणाले. हे आम्ही नेहमी सांगत आलोय आणि त्या ऑडिओ क्लिप मधून पण तेच स्पष्ट होतंय असंही दानवे म्हणाले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला राजकीय निवडणुकीमध्ये भूमिका मांडण्याचा तात्विक वैचारिक अधिकारच राहिले नाही. राजकारणाचा बाजार यांनी मांडला आहे असं वक्तव्य करत दानवे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

