
ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) आज त्यांचा 66वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही आपल्या सदाबहार सौंदर्याने त्या रसिकांच्या मनाला घायाळ करतात.

जया यांनी वयाच्या 12व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या अभिनेत्रीला ‘भूमी कोसम’ नावाच्या चित्रपटासाठी अवघी 10 रुपये फी दिली गेली होती.

जया यांनीही राजकारणात खोलवर छाप पाडली आहे. त्यांनी यूपीच्या रामपूरमधून निवडणूक लढवली आणि 2004 ते 2014पर्यंत खासदारही राहिल्या. यानंतर, त्यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून 2019मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली, परंतु तेथे त्यांचा पराभव झाला.

चित्रपटांबद्दल बोलायचे तर, जया प्रदाने त्यांच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे 200 चित्रपटांत काम केले. जया यांनी त्यांच्या काळातील प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केले आहे.

जया यांनी जेव्हा श्रीकांत नहाटाशी लग्न केले, ते आधीच विवाहित होते. विशेष म्हणजे श्रीकांतला पहिल्या पत्नीपासून तीन मुले देखील होती.

आझम खानने अभिनेत्रीवर वादग्रस्त विधान केले, तेव्हासुधा जया प्रदा चर्चेत आल्या होत्या.

चाहत्यांना हे माहित नसेल की, या सुंदर अभिनेत्रीचे खरे नाव ललिता राणी आहे. मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी त्यांनी आपले नाव जया प्रदा असे करून घेतले.

आज जया कदाचित चित्रपटांपासून दूर असतील पण, त्यांच्या सौंदर्याची जादू आजही कायम आहे. चाहत्यांमध्ये अजूनही त्यांची अभिनेत्री म्हणून ओळख कायम आहे