
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे. या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.

गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. तरीही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाही उन्हाचा तडाखा अधिक असल्याने प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य नसेत तर चिंता नको. तुमच्यासाठी खास गुढीपाडव्याचे खास मराठमोळ्या शुभेच्छा.

कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी, कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी, एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी, नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारूया ही गुढी, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

हे नववर्ष तुम्हांस व तुमच्या कुटूंबियांस , सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

राग-रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा, एकत्र येऊन साजरा करुया सण गुढीपाडवा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!