International Men’s Day 2026: कदाचित पुरुषांनाही माहित नसतील त्यांच्याविषयीचे ‘हे’ इंटरेस्टिंग फॅक्ट्स!
International Men's Day 2026: महिलांप्रमाणेच पुरुषांनाही अनेकदा सामाजिक अन्याय, भेदभाव, मानसिक त्रास आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. पुरुषांच्या समस्या समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पुरुषांविषयीचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊयात.

आयुष्यातील सहा महिने जातात शेव्हिंग करण्यात!: एका अभ्यासानुसार, पुरुष आपल्या संपूर्ण आयुष्यातील जवळपास सहा महिने दाढी करण्यासाठी खर्च करतात. म्हणजेच रोजच्या काही मिनिटांच्या या सवयीसाठी आयुष्यातील बराच वेळ जातो.
महिलांपेक्षा पुरुष कमी वेळा पापण्यांची उघडझाप करतात!: असे म्हटले जाते की पुरुष एका मिनिटात सरासरी 11 वेळा पापण्यांची उघडझाप करतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण 19 वेळा असल्याचे सांगितले जाते.
पुरुष दिवसातून सहा वेळा खोटे बोलतात?: एका अभ्यासात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पुरुष दिवसातून सरासरी सहा वेळा खोटे बोलतात, तर महिलांचे हे प्रमाण तीन वेळा असल्याचे सांगितले जाते. अर्थात, प्रत्येक व्यक्तीला या आकडेवारीत बसवता येणार नाही!
टक्कल असलेले पुरुष अधिक ताकदवान असतात?: काही संशोधनांमध्ये टक्कल असलेल्या पुरुषांना अधिक प्रभावी किंवा ताकदवान समजले जात असल्याचा उल्लेख आढळतो. मात्र, टक्कल आणि प्रत्यक्ष शारीरिक ताकद यांचा थेट संबंध असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
पुरुषांना महिलांपेक्षा जास्त घाम येतो!: शारीरिक रचना आणि शरीरातील चयापचय प्रक्रियेमुळे पुरुषांना अनेकदा महिलांच्या तुलनेत जास्त घाम येऊ शकतो. विशेषतः व्यायाम किंवा शारीरिक मेहनत करताना हा फरक जाणवतो.
प्रेम व्यक्त करण्यात पुरुषही असतात पुढे!: प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली की पुरुष मागे राहत नाहीत. 'I Love You' म्हणण्याच्या बाबतीत पुरुष महिलांपेक्षा अधिक पुढाकार घेतात, असा एक लोकप्रिय दावा केला जातो.
आत्महत्येच्या आकडेवारीत पुरुषांचे प्रमाण चिंताजनक!: जगभरातील आत्महत्यांच्या आकडेवारीत पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे अनेक अहवालांमध्ये दिसून आले आहे. मानसिक आरोग्य, सामाजिक दबाव आणि मदत मागण्याबाबतचा संकोच यांसारख्या बाबींकडे यामुळे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित होते.