Photo : धरणावर स्टंटबाजी ठरली जीवघेणी; एकाचं निधन तर दुसऱ्याची सुखरुप सुटका… नेमकं घडलं तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे, धरणं देखील ओसांडून वाहायला सुरुवात झाली आहे. म्हणून नागरिकांनी सतर्क राहावं... असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं. पण नाशिक येथे भयानक घटना घडली आहे. हरणबारी धरणावर मोठी दुर्घटना घडली आहे.

| Updated on: Aug 03, 2026 | 9:32 AM
1 / 5
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील हरणबारी धरणावर घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पण घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र खळबळ  उडाली आहे.

2 / 5
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असताना  दुर्दैवी घटना घडली. सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्यासाठी विजय महादू सोनवणे यांनी पाण्यात उडी घेतली.

3 / 5
मात्र, पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात अडकून बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या एका तरुणानेही पाण्यात उडी घेतली. तो देखील खोल पाण्यात अडकला.

4 / 5
घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर दोरीच्या साहाय्याने दुसऱ्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

5 / 5
दरम्यान, विजय महादू सोनवणे यांचा मृतदेह सांडव्यापासून काही अंतरावर शोधण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धरण परिसरात धोकादायक स्टंटबाजी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us