
हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दोघे विभक्त झाल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा आहे.

नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी 2020 मध्ये सर्वात अगोदर कोर्ट मॅरेज केले. लग्नाच्या काही महिन्यामध्येच नताशा हिने मुलाला जन्म दिला.

14 फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपुरमध्ये धमाकेदार पद्धतीने यांनी लग्न केले. क्रिश्चियन पद्धतीने यांनी लग्न केले. हार्दिक आणि नताशा यांनी ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नात थेट लिपलॉक केले होते.

क्रिश्चियन पद्धतीने लग्न केल्यानंतर हिंदू रितीरिवाजाप्रमाणेही लग्न केले. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

आता यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, यावर अजूनही हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी काहीच भाष्य हे केले नाहीये.