तो येवो किंवा त्याचा…, मी मैदानात उतरणारच! मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँचं खुलं चॅलेंज

Hasin Jahan Mohammed Shami : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही म्हटले आहे.

| Updated on: Sep 25, 2026 | 9:12 PM
1 / 5
मोहम्मद शमी आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या भेटीनंतर अमरोहा मतदारसंघात शमीच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शमीची पत्नी हसीन जहाँ यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शमी किंवा त्यांचा भाऊ हसीब ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्यांच्याविरोधात आपणही मैदानात उतरू, असं हसीन जहाँ यांनी सांगितलं आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचाही पर्याय त्यांनी बोलून दाखवला आहे.

2 / 5

ही राजकीय लढत उत्तर प्रदेशातील 'अमरोहा' विधानसभा मतदारसंघातून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जो मोहम्मद शमीचा जिल्हा आणि मूळ गाव आहे.

3 / 5

गेल्या काही काळापासून मोहम्मद शमी राजकारणात सक्रिय होणार असून तो आगामी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हसीन जहाँने हे आक्रमक आणि आव्हानात्मक विधान केले आहे.

4 / 5

शमी आणि हसीन जहाँ यांच्यात २०१८ पासून कौटुंबिक छळ आणि इतर गंभीर आरोपांवरून कायदेशीर लढाई सुरू आहे. आता हा वैयक्तिक आणि कायदेशीर वाद कोर्टाच्या बाहेर पडून थेट राजकीय मंचावर आणि जनतेच्या दरबारात पोहोचण्याची चिन्हे आहेत.

5 / 5

हसीन जहाँच्या या थेट आव्हानामुळे क्रिकेट चाहत्यांसह राजकीय क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. २०२७ च्या निवडणुकीत अमरोहामध्ये खरोखरच पती-पत्नीमध्ये अशी अभूतपूर्व राजकीय लढत पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us