
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां सध्या आपल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. यात तिच्या बोलण्याच्या शैलीमध्ये धमकी आहे. सोशल मीडियावर एक्टिव राहणाऱ्या हसीन जहांने धमकीच्या स्वरात रील्स बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केलीय.

तिने व्हिडिओ बनवून पोस्ट करण्याचा इरादा जाहीर केलेला नाही. इशारा कोणाकडे आहे हे सुद्धा तिने सांगितलेलं नाही. पण मोहम्मद शमीचे फॅन्स भडकले आहेत. सर्वप्रथम हे जाणून घ्या की तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये काय-काय आहे?.

हसीना जहांने आपला नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. मला अशी-तशी मुलगी समजू नका, असं तिने यात म्हटलय. लोक आपल्या अदांनी आग लावतात आणि मी आपल्या बोलण्याने. हसीना जहांच्या या व्हिडिओला फक्त रील्स समजायचं की रील्सच्या बहाण्याने दिलेली धमकी.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जे लिहिलय त्यातून इरादा स्पष्ट होतो. काही नको बोलू आणि बोलला तर समोरचा मीडियाला खरेदी करुन त्याला आपल्याबाजूने बोलायला सांगतो. त्यांना वाचवण्याच अपील करतो. हसीन जहांच्या या बोलण्यावरुन तिचा इशारा कोणाकडे आहे, ते स्पष्ट होतं. आता मोहम्मद शमीचे फॅन्सही तिच्यावर भडकले आहेत.

एकाने व्हिडिओ पोस्टवर कमेंट करताना लिहिलय की, तुम्ही तुमच्याच घरात आग लावलीय. कोणी म्हटलय शमीच्या आयुष्याला आग लावली. एकाने हसीना जहांला आंटी जी म्हणत लिहिलय की, तुम्ही मुलगी नाही आहात. तुम्ही शमीच्या 4 लाखांवर जगताय अशा कमेंट केल्या आहेत.