चहा आरोग्यास घातक, पण जेवणानंतर ‘या’ पानांपासून बनलेला एक चहा पोटाच्या आरोग्यास लाभदायक
डॉक्टर कायम चहा न पिण्याचा सल्ला देतात. चहा आरोग्यास चांगला नाही... असं डॉक्टर कायम सांगत असतात... पण 'या' पानांपासून बनलेला चहा आरोग्यास लाभदायक ठरु शकतो... पोटाच्या विकारांवर चहा लाभदायक आहे.

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे खूप महत्त्वाचे आहेत. रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होते. पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी पुदिना विशेषतः चांगला आहे.

आजच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास होतो. जेवणानंतर लगेच पोट फुगते. अनेक औषधे घेऊनही ही समस्या दूर होत नाही. अशावेळी घरगुती उपाय अवलंबता येतात.

पुदिना पचनसंस्थेतील स्नायूंना आराम देण्यास मदत करतो. पुदिन्याचा चहा प्यायल्याने पोट फुगणे आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

जेवणानंतर पुदिन्याचा चहा पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे पचनक्रिया जलद होण्यास मदत होते. तसेच पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळण्यासही मदत होते. ज्या लोकांना तीव्र आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांनी ते टाळावे, कारण त्यामुळे आम्लपित्त वाढू शकते.

विशेषतः ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांना आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे केवळ पोटाच्या त्रासापासून आराम मिळत नाही, तर ते आरोग्यासाठीही चांगले असते. पण तुम्हाला कोणता त्रास असेल तर, डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या.