हेल्दी नाश्ता हवा आहे? मग दररोजच्या आहारात समाविष्ट करा ही खास डिश..

तुम्ही दररोजच्या नाश्त्यात काय खाता हे अत्यंत महत्वाचे आहे. कायमच सकाळचा नाश्ता निरोगी असायला हवा. कारण त्यावरून दिवसभराची ऊर्जा ठरलेली असते.

| Updated on: Mar 26, 2026 | 1:52 PM
1 / 5
इडली आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र, बरेच लोक इडली तांदळापासून तयार होते म्हणून खाणे टाळतात. जर तुम्हाला इडली खायला आवडत असेल आणि हेल्दी पाहिजे असेल तर एक उत्तम पर्याय आहे. 

इडली आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र, बरेच लोक इडली तांदळापासून तयार होते म्हणून खाणे टाळतात. जर तुम्हाला इडली खायला आवडत असेल आणि हेल्दी पाहिजे असेल तर एक उत्तम पर्याय आहे. 

2 / 5

तुम्ही नाचणीच्या पिठाचीही इडली घरी आरामात तयार करू शकता. विशेष म्हणजे सध्याच्या हंगामात नाचणी खाणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

3 / 5

नाचणीला रात्री भिजत घाला आणि सकाळी मिक्सरमधून बारीक त्याचे पीठ काढून घ्या. मग काय नेहमी बनवता तश्या लुसलुसीत इडल्या तयार करून घ्या. 

4 / 5

जर तुम्हाला अजून हेल्दी इडली हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही खिसलेले गाजरही मिक्स करू शकता. गाजरासोबतच बिटही मिक्स केले तर ते अधिक उत्तम होईल. 

5 / 5

ही नाचणीची इडली आपण सांबर आणि चटणीसोबतही खाऊ शकता. यामुळे आरोग्याला हवी ती पोषक घटक मिळतील आणि हेल्दी नाश्ता देखील तुम्हाला मिळण्यास मदत होईल. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us