अगोदर स्वीडनमध्ये निवडून आलेल्या चुलत बहिणीवर टीका, आता सुजय विखे पाटलांची मोठी पलटी, थेट म्हटले..
नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार झाल्या. त्यानंतर विखे कुटुंबाकडून काैतुक करण्यात आले. मात्र, त्यानंतर नीला विखे यांनी थेट आपला यांच्यासोबतच काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सुजय विखेंनी याबाबत मोठी टीका केली.

नीला विखे पाटील या स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेंवर टीका केली. त्याच टिकेला धरून महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी देखील विखेंवर टीका करत दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूर पाहू नये, असा टोला लगावला आहे. नीला विखे या दुसऱ्या देशात जाऊन खासदार झाल्या. आपल्या आणि देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, त्यांनी जे वक्तव्य केलं… माझं कुणी श्रेय घेऊ नये, असे त्यांनी म्हटले. दुसऱ्याचे नाव वापरायचं काही लोकांचा धंदा आहे. गेल्या अनेक निवडणुकीत तुम्ही त्यांच्याबद्दल काय वक्तव्य केले हे सर्व दुनियेला माहिती आहे असं देखील लंके यांनी म्हटला आहे.
निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी नीला विखे पाटील यांच्या आरोपावर सुजय विखेंवर टिका केली होती. त्यावर जोरदार टीका सुजय विखेंनी केली. सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, निलेश लंके यांचे दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूरचे डायलॉग आता जुने झालेत. निलेश लंके यांना स्वीडन कुठे आहे हे माहीत आहे का? मागील तीन वर्षांत लंके यांच्यावर वैयक्तिक पातळीवर कधीही बोललो नाही.
विकासकामांऐवजी काैटुंबिक वादात पडून राजकारण करणे जिल्ह्यासाठी धोकादायक आहे. महिलांच्या कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दाही उपस्थित करता आला असता, मात्र सभ्यता म्हणून बोललो नाही. समाजासाठी काही काम केले नाही, त्यामुळे हायलाईट होण्यासाठी मुद्दा शोधला जातोय. लंके यांच्यावर ही टीका सुजय विखे पाटील यांनी केली. रोहित पवार यांनीही सुजय विखेंवर जोरदार टीका केली.
रोहित पवार यांच्यावर टीका करताना सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, रोहित पवार हे सुसंस्कृत परिवारातील लोकप्रतिनिधी, त्यांनीही सुसंस्कृतपणा जपावा. आमच्या कौटुंबिक विषयांवर बोलत असाल तर तुमच्या कौटुंबिक कलहावरही चर्चा होऊ शकते… विखे-पवार कुटुंबांनी कौटुंबिक विषय कधीही माध्यमांसमोर आणले नाहीत… आम्ही पक्षांतर केले असेल, तरी जनतेने पाच वेळा महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये निवडून दिलय..
कौटुंबिक गोष्टींचे राजकारण थांबले पाहिजे, श्रेयवादाचा विषय नाही…नीला विखे स्वकष्टाने स्वीडनमध्ये काम करत आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय…आमच्या कौटूंबिक प्रश्नावर चर्चा का ? नीला विखे पाटील या स्विडनच्या खासदार झाल्या त्याबद्दल पत्रकारांनी विचारले.. एक परिवार म्हणून राहीलोय त्यामुळे भाषणात मी मार्मिक पणे अभिनंदन केले…
