डोळ्यांखाली येतायेत ब्लॅक सर्कल्स, काय आहेत त्याची कारणं?

अनेकांच्या डोळ्यांखाली काळे डाग असतात, त्याला ब्लॅक सर्कल्स असं देखील म्हणतात. पण ते काळे डाग डोळ्यांखाली का दिसतात, याची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं असतं. त्याची कारणं काय असू शकतात. याबद्दल देखील माहिती असणं गरजेचं असते... तर जाणून घ्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स का दिसतात.

| Updated on: Sep 19, 2026 | 3:59 PM
1 / 5
डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही एक सामान्य समस्या आहे. याच काळ्या डागांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं आणि त्याचा संबंध शारीरिक आरोग्य व जीवनशैलीशी देखील असू शकतो. ब्लॅक सर्कल्सची मुख्य कारणं आणि ती कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल जाणून घ्या.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही एक सामान्य समस्या आहे. याच काळ्या डागांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं आणि त्याचा संबंध शारीरिक आरोग्य व जीवनशैलीशी देखील असू शकतो. ब्लॅक सर्कल्सची मुख्य कारणं आणि ती कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल जाणून घ्या.

2 / 5

पुरेशी झोप न मिळाल्याने तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते, ज्यामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू शकतात. मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे डोळे अधिक थकलेले दिसू शकतील आणि डोळ्यांखालील भाग काळा दिसू लागतो.

3 / 5

निर्जलीकरणामुळे डोळ्यांखालील त्वचा निस्तेज होऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू शकतात. सतत सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी, बाहेर जाताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस वापरणं महत्त्वाचं आहे. यामुळे सूर्य किरणांमुळे होणाऱ्या पिगमेंटेशनचा धोका कमी होतो.

4 / 5

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी, दररोज पुरेशी झोप घेणं आणि शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे महत्त्वाचे आहे. प्रौढ व्यक्तींना साधारणपणे 7 ते 8 तास झोपेची आवश्यकता असते. पाण्याची गरज प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते.

5 / 5

व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक ॲसिड किंवा रेटिनॉल असलेले आय क्रीम वापरल्याने काही लोकांना मदत होऊ शकते. तथापि, कोणतंही उत्पादन सावधगिरीने वापरलं पाहिजे, कारण डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा संवेदनशील असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us