
खडकवासला धरण 100 टक्के भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीत चांगले पाणी आले आहे. डेक्कन नदीपात्रातला रस्ता पावसामुळे प्रशासनाने बंद केला आहे.


मुळा नदीला पाणी आल्यामुळे बाबा भिडे पुलाला पाणी लागले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. भिडे पुलावरील वाहतूक पुणे पोलिसांनी बंद केली आहे. बॅरिकेट लावून नदीपात्रालगत असणारे रस्ते बंद केले आहे.

पुणे शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. त्याचा परिणाम वाहतूक कोडींवर झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पडलेली झाडे हटवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत आहे. पर्यटननगरी लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे.