AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट! तब्बल 7 जिल्ह्यांना इशारा, मोठी खळबळ, अवकाळी पावसासोबतच…

Maharashtra Weather Update : वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यावर मोठं संकट! तब्बल 7 जिल्ह्यांना इशारा, मोठी खळबळ, अवकाळी पावसासोबतच...
Rain
| Updated on: Feb 02, 2026 | 7:25 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतोय. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात थेट अवकाळी पावसाचा इशारा दिला. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात थंडी फार काही नसणार असल्याचे अगोदरच भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामध्येच आता थेट अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. काल राज्यात अनेक भागात धूसर वातावरण बघायला मिळाले. यासोबतच वायू प्रदूषणही चांगलेच वाढले होते. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. श्वास घेण्यासही समस्या होत आहे. सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधित समस्या अधिक जाणवत आहेत.

भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला. राज्यात सध्या उकाडा वाढला असून पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले. उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. थेट येलो अलर्टही पावसाचा जारी केलाय. फक्त उत्तर महाराष्ट्रच नाही तर राज्यातील इतरही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव या भागात जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

येलो अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, अहिल्यानंतर आणि ठाणे या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. केरळच्या किनाऱ्यालगत 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. राज्यात पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे, राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा अवकाळी पाऊस झाला होता आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने थेट पावसाचा इशारा जारी केला. वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्यात थंडी कायम होती. मात्र, जानेवारी महिन्यात सुरूवातीपासूनच तापमानात बदल होताना दिसला. 1 जानेवारीला मुसळधार पाऊस आला आणि त्यानंतर वातावरणात बदल झाला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं