AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar : तू वाईट काम करते, किती ओव्हरॲक्टिंग…नाना पाटेकरांनी क्रांती रेडकरला चांगलंच सुनावलेलं, काय घडलेलं?

Kranti Redkar On Nana Patekar : नाना पाटेकर यांनी क्रांती रेडकरला सुनावलेलं, याबद्दल अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Kranti Redkar : तू वाईट काम करते, किती ओव्हरॲक्टिंग...नाना पाटेकरांनी क्रांती रेडकरला चांगलंच सुनावलेलं, काय घडलेलं?
| Updated on: Nov 03, 2026 | 2:35 PM
Share

नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. आजही चाहते नानांची आवर्जून आठवण काढतात. काही कलाकार त्यांच्या आठवणी शेअर करतात. अशातच आता मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांचा किस्सा सांगितला आहे. क्रांती रेडकरनं वाईट अभिनय केल्यामुळे नाना पाटेकर यांनी तिला सुनावलेलं.

काय म्हणाली क्रांती रेडकर?

ऑडिशनचा किस्सा सांगताना क्रांती म्हणाली की, ‘नानांबद्दल मला एक गोष्ट सांगायला आवडेल. त्यांनी मला एका ऑडिशनला पाठवलं होतं. एकदा आजिवासन स्टुडिओला आम्ही ‘तू तू मैं मैं’ नाटक रेकॉर्ड करत होतो. तिथे नाना पाटेकर पहिल्यांदा भेटले आणि ते मला बघता क्षणी म्हणाले की, एका सिनेमाचं ऑडिशन सुरू आहे आणि मला असं वाटतं की, त्यांना अशीच तुझ्यासारखी सावळी मुलगी हवीये तू जा आणि ऑडिशन दे. तिथे काही माझी निवड झाली नाही.’

नाना  पाटेकरांनी क्रांती रेडकरला दिलेले अभिनयाचे धडे 

‘त्यानी माझं ‘आमच्यासारखे आम्हीच’ मालिकेतील काम पाहिलं. तेव्हा मी खूप वाईट काम करायचे. त्यांनी मला फोन केला आण सांगितलं आता मला कळलं तुझी निवड का झाली नाही? तू वाईट काम करते. किती ओव्हरअॅक्टिंग करते, काय चाललंय तुझं. मी म्हटलं, सॉरी नाना. ते म्हणाले, नाही नाही बाळा कमी अॅक्टिंग कर. अशाप्रकारे ही सगळी मंडळी मला काही न काही शिकवत गेली.’ असं क्रांतीनं शेवटी म्हटलं. ‘कलाकृती मीडिया‘ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर बोलत होती.

दरम्यान, क्रांती रेडकरच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘मैत्रेया’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेत्रीनं केलं असून हा सिनेमा 20 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अभिनेत्रीनं ‘जत्रा‘, ‘शिक्षणाच्या आईचा घो‘, ‘फक्त लढा म्हणा‘, ‘खो–खो‘, ‘तीन बायका फजिती ऐका‘, ‘काकण’, ‘नो एन्ट्री’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Follow Us
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा