
टी-२० वर्ल्ड कपध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. २०१४ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने ६ सामन्यात ३१९ धावा केल्या होत्या. या यादीमध्ये कोहली पहिल्या स्थानावर आहे.

या यादीत श्रीलंका संघाचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशान आहे. दिलशानने २००९ च्या वर्ल्ड कपमध्ये ३१७ धावा केल्या होत्या.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. २०२१ च्या वर्ल्ड कपमध्ये बाबरने ३०३ धावा केल्या होत्या.

चौथ्या स्थानी श्रीलंका संघाचा माजी खेळाडू माहेला जयवर्धेने याने २००९ साली ६ सामन्यात ३०२ धावा केलेल्या.

विराट कोहलीची या यादीमध्ये परत एकदा नंबर लागतो. कोहलीने २०२२ च्या वर्ल्ड कपमध्ये २९६ धावा केल्या होत्या.