
amit shah

शाह हे आडनाव पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे. ज्याचा अर्थ राजा, सम्राट असा होतो. भारतात, शाह आडनाव सहसा व्यापारी वर्ग किंवा शेख वर्गाशी संबंधित असते.

ऐतिहासिकदृष्ट्या, शाह समुदायातील लोक व्यापारी, ज्वेलर्स किंवा सावकार होते. तसेच, नेपाळमधील राजघराण्यात शाह हे आडनाव वापरलं जातं.

पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळचं एकीकरण केलं आणि शाह घराण्याची पायाभरणी केली. नेपाळमध्येही शाह म्हणजे राजेशाही किंवा राजा.

मुस्लिम समाजात, शाह हे आडनाव बहुतेकदा सूफी संत, पीर किंवा आध्यात्मिक शिक्षकांशी जोडलं जातं. शाह हे आडनाव सन्माननीय पदवी म्हणून दिले जाते. जसे की "पीर शाह", "सय्यद शाह" आणि इतर संत पीरांच्या नावांसह लिहिलेलं आहेत.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अनेक मुस्लिम कुटुंबांनी शाह आडनाव म्हणून स्वीकारलं आहे. शाह आडनाव बहुतेकदा इराण, काश्मीर, मध्य आशियातील किंवा सूफी परंपरेशी संबंधित कुटुंबांमध्ये आढळतं.