
टीव्हीची लाडकी सून श्वेता तिवारी अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिनं सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

हे बोल्ड फोटो शेअर करत श्वेतानं कॅप्शनमध्ये लिहिलं - जर काही नियम असतील तर ते मोडा आणि त्यांच्यासाठी कधीही माफी मागू नका. श्वेताचे हे फोटो लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

श्वेताचे चाहते फोटोंवर कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली - हॉट मॉम. तर दुसऱ्यानं लिहिलं - तू कधीच म्हातारी होणार नाहीस.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्वेता तिवारी सध्या स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसत आहे. ती धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

श्वेता या फोटटोमध्ये खरोखर कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो आता इंटरनेटचा पारा वाढवत आहेत.