
बॉलिवुड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच आता फातिमाने आपले काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पाहुयात हे फोटो.

या फोटोत फातिमाने जारा ब्रँडचे कपडे घातलेले आहेत.

सोशल मीडियावर फातिमाने हे फोटो टाकताच चाहत्यांना ते चांगलेच पसंत आलेत.

या फोटोंमध्ये फातिमा पिंजऱ्यात उभी राहून वेगवेगळ्या अदांमध्ये फोटो काढताना दिसत आहे.

फातिमाच्या या फोटोंना जसे तिचे चाहते पसंत करत आहेत, तसेच काही लोक तिला ट्रोलही करत आहेत.

अपारशक्ती खुराना आणि अनिल कपुरने फातिमाच्या या फोटोंचं कौतुक करत कमेंट केलीय.

फातिमा सना शेख या फोटोंमध्ये घायाळ करणाऱ्या अदा करते आहे.

त्यामुळेच हे फोटो फातिमाच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरलेत.

फातिमाला दंगल चित्रपटातून खरी ओळख मिळाली.

तिने तेलुगु चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

आता आगामी कोणत्या चित्रपटात फातिमा दिसते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे.