AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळाकुट्ट अंधार असतानाही डास तुम्हाला अचूक कसे शोधतात? डोकं चक्रावून टाकणारं लॉजिक समोर

अंधारातही डास माणसांना अचूक कसे शोधतात आणि त्यांच्याकडे कोणती वैज्ञानिक यंत्रणा असते, याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 3:20 PM
Share
हल्ली डासांचे प्रमाण वाढले आहे. पण जेव्हा खोलीत पूर्ण अंधार असतो किंवा आपण चादर जेव्हा झोपलेले असतो तेव्हा डास अचूकपणे आपल्या कानापाशी गुणगुणायला कसे येतात? त्यांच्याकडे नाईट व्हिजन असतं का? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो.

1 / 8
पण संशोधकांच्या मते, यामागे कोणतीही जादू नसून पूर्णपणे वैज्ञानिक कारणे आहेत. डास तुम्हाला पाहण्यासाठी डोळ्यांचा नाही, तर तुमच्या शरीरातून मिळणाऱ्या विशिष्ट संकेतांचा वापर करतात. त्याद्वारे ते तुमच्याकडे पोहोचतात.

2 / 8
डास माणसाकडे आकर्षित होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपण नाकाद्वारे बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साइड (CO2) वायू. डासांच्या अँटेनावर अत्यंत संवेदनशील संवेदक (Sensors) असतात, जे सुमारे ३० ते ५० फूट अंतरावरूनही कार्बन डायऑक्साइडचा वास ओळखू शकतात.

3 / 8
अंधारात जेव्हा आपण श्वासोच्छवास करतो, तेव्हा डासांसाठी तो वायू एका दिशादर्शकाप्रमाणे (GPS) काम करतो आणि ते थेट आपल्या दिशेने झेपावतात. केवळ श्वासच नाही, तर मानवी शरीराची नैसर्गिक उष्णता देखील डासांना आकर्षित करते.

4 / 8
डासांमध्ये नैसर्गिक इन्फ्रारेड सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स त्यांना अंधारात उष्ण रक्ताचे प्राणी किंवा व्यक्ती शोधण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही झोपलेले असता, तेव्हा तुमच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेच्या लहरी डासांना तुमच्या उपस्थितीची जाणीव करून देतात.

5 / 8
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा वास वेगळा असतो. आपल्या त्वचेतून बाहेर पडणारा घाम, त्यातील लॅक्टिक ॲसिड, अमोनिया आणि यूरिक ॲसिड यांसारखे घटक डासांना आकर्षित करण्यासाठी चुंबकाप्रमाणे काम करतात.

6 / 8
ज्या व्यक्तींच्या शरीरातून जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिड उत्सर्जित होते, त्यांना डास इतरांच्या तुलनेत जास्त चावतात. याच कारणामुळे एकाच खोलीत झोपलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाला डास जास्त त्रास देतात. तर दुसऱ्याला कमी त्रास देतात.

7 / 8
डासांचे चावणे केवळ त्रासदायकच नसते, तर ते मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका व्हायरससारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

8 / 8
Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...