
अभिनेता रणवीर सिंह याच्या 'धुरंधर - २' ने सिनेमागृहात रिलीज नंतर इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने विकेंडला प्रत्येक दिवसाला प्रत्येकी १०० कोटीहून कमावले आहे. तर इतर आठवड्याच्या इतर दिवसातही सरासरी ५० कोटीहून अधिक कलेक्शन केले आहे.

'धुरंधर - २'च्या कमाई आणि कलाकाराच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र होत आहे. चौधरी अस्लमच्या रोलमधील संजय दत्त असो वा राकेश बेदी केलेला जमील जिमाली यांच्या अभिनयाचे कौतूक होत आहे. चला तर पाहूयात या कलाकारांना याची बिदागी किती मिळाली हे पाहूयात...

या चित्रपटातील मेकर्सने कलाकाराला दिलेल्या मानधनाबाबत काहीही माहिती दिलेली नाही. परंतू सोर्सने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटात जसकिरत सिंह रांगी आणि हमजा अली मजारीच्या रोलसाठी रणवीर सिंह याला ५० कोटी रुपये मिळाले आहेत.तर लीड अभिनेत्री सारा अर्जून हिला १ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते.

बातम्यानुसार अभिनेता अर्जून रामपाल याला मेजर इक्बालचा रोल करण्यासाठी एक कोटी रुपयांची फी मिळाली आहे. तर चौधरी असलमच्या रोलसाठी संजय दत्तला १० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर अजय संन्याल रोलसाठी आर.माधवन याला ९ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

या चित्रपटाच्या पहिल्या भागात रहमान डकैतचा रोल अक्षय खन्ना याने त्याच्या अभिनयामुळे चांगलाच गाजवला होता. आणि चित्रपटाने १३०० कोटींचा गल्ला जमा केला. यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हिंदीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आता साल २०२६ मध्ये रणवीर सिंह याचा धुरंधर - २ रिव्हेन्ज सिनेमागृहात बक्कळ कमाई करत आहे. सिनेमा लोकांना आवडत असून आठ दिवसात कलेक्शन १००० कोटी रुपये झाले आहे. आतापर्यंत या सिनेमाने १०८८ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाईचे रेकॉर्ड करतो हे पाहावे लागेल.