
मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तेलापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत सगळीकडे ते सक्रिय आहेत. ते दररोज कोट्यवधी रुपये कमवतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती एप्रिल 2025 पर्यंत सुमारे $96.7 अब्ज (8 लाख कोटी रुपये ) आहे. यासह ते जगातील 18 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबानी यांची दररोजची कमाई सुमारे 163 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ ते प्रत्येक तासाला सुमारे 6.79 कोटी रुपये आणि दर मिनिटाला सुमारे 11.3 लाख रुपये कमवता.

मुकेश अंबानी हे एका सेकंदाला 52 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये कमवतात. ही रक्कम एखाद्या सामान्य नोकरदाराच्या मासिक पगारापेक्षा जास्त आहे.

मुकेश अंबानी हे अँटिलिया या घरात राहतात. या घराची किंमत सुमारे 15000 कोटी रुपये आहे. हे घर जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये गणले जाते. यात मंदिर, स्विमिंग पूल, जिम, स्पा, थिएटर अशा गोष्टींचाही समावेश आहे.