Tukaram Mundhe: धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंडेंना सरकारकडून किती पगार मिळतो?

IAS Officer Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. सध्या राज्यात ते करत असलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरु आहे.

| Updated on: Aug 06, 2026 | 3:06 PM
1 / 5
तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी झाला असून ते बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावचे आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुंडे यांची मागील दहा वर्षांत एकूण २३ वेळा बदली झाली आहे.

तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी झाला असून ते बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावचे आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुंडे यांची मागील दहा वर्षांत एकूण २३ वेळा बदली झाली आहे.

2 / 5

सत्ताधाऱ्यांचा रोष त्यांना अनेकदा सहन करावा लागतो, तरीही कष्ट, प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणामुळे ते जनतेचे लाडके अधिकारी मानले जातात. जिथे ते जातात तिथे सामान्य लोक त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतात आणि अनेक ठिकाणी त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून जनआंदोलनेही उभी राहिलेली आहेत.

3 / 5

तुकाराम मुंडे राज्यात विविध ठिकाणी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि सचिव म्हणून काम केले आहे. सध्या ते करत असलेल्या कारवाईची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.

4 / 5

काही वर्षांपूर्वी सचिव दर्जाच्या पदांवर जाण्यापूर्वी त्यांचे वेतन अंदाजे एक लाख चौवेचाळीस हजार रुपये इतके होते. त्यानंतर सचिव दर्जाच्या पदांवर रुजू झाल्यानंतर आणि सातव्या वेतन आयोगानुसार त्यांचे वेतन वाढले आहे.

5 / 5

सध्या तुकाराम मुंडे यांचे वेतन दोन लाख ते अडीच लाख रुपयांच्या घरात असू शकते. त्यांच्या सेवेला दहा वर्षे पूर्ण झालेली असल्यानेही भरीव वेतन मिळते. (टीप: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us