हेल्मेटला कुबट वास येतोय? फक्त 15 मिनिटांत होईल चकाचक, एकदा जुगाड कराच

तुमच्या हेल्मेटमधील दुर्गंधी आणि घाम साचल्यामुळे होणारी केसांची गळती टाळण्यासाठी घरच्या घरी हेल्मेट स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या. पॅडिंग धुण्यापासून ते काचेची काळजी घेण्यापर्यंतची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

| Updated on: Mar 12, 2026 | 1:57 PM
1 / 8
दुचाकी चालवताना सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. परंतु उन्हाळा असो वा पावसाळा, सततच्या वापरामुळे हेल्मेटमध्ये घाम, धूळ आणि डोक्यातील तेल साचते. यामुळे केवळ दुर्गंधीच येत नाही, तर टाळूला खाज सुटणे, पुरळ येणे किंवा केस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दुचाकी चालवताना सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. परंतु उन्हाळा असो वा पावसाळा, सततच्या वापरामुळे हेल्मेटमध्ये घाम, धूळ आणि डोक्यातील तेल साचते. यामुळे केवळ दुर्गंधीच येत नाही, तर टाळूला खाज सुटणे, पुरळ येणे किंवा केस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 8

आपण अनेकदा बाहेरील काच पुसतो, पण आतील भागाकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हालाही तुमचे हेल्मेट दीर्घकाळ टिकवायचे असेल आणि त्यातील दुर्गंधी घालवायची असेल तर तुम्ही घरातच त्याची स्वच्छता करु शकता.

3 / 8

हल्ली बऱ्याच नवीन हेल्मेटमध्ये आतील पॅडिंग आणि 'लाईनर' काढण्याची सोय असते. ते काळजीपूर्वक काढून घ्या. जर तुमच्या हेल्मेटमध्ये ही सोय नसेल, तर तुम्हाला संपूर्ण हेल्मेटच पाण्यात बुडवून धुवावे लागेल. पण यापूर्वी हेल्मेटची काच काढून ठेवा. जेणेकरुन ती घासली जाणार नाही.

4 / 8

त्यानंतर एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शॅम्पू मिसळा. त्यात पॅडिंग १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे त्यातील घाम आणि तेलकटपणा मऊ होईल. त्यानंतर हलक्या हाताने पॅडिंग दाबा. ते जास्त जोरात पिळू नका किंवा वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका. कारण यामुळे त्यातील फोमचा आकार बिघडू शकतो. यानंतर शेवटी स्वच्छ पाण्याने फेस पूर्णपणे जाईपर्यंत धुवा.

5 / 8

हेल्मेटच्या बाहेरील भागावर रस्ते आणि प्रदूषणाचे थर साचलेले असतात. त्यामुळे एका ओल्या कापडाने वरची धूळ पुसून घ्या. जिथे घाम किंवा चिखलाचे डाग वाळलेले असतील, तिथे ओला रुमाल ५ मिनिटे तसाच ठेवा. तसेच बारीक कोपऱ्यांमधील धूळ काढण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा.

6 / 8

हेल्मेटची काच अतिशय नाजूक असते. या काचेवर सर्वात जास्त स्क्रॅच पडण्याची भीती असते. ती स्वच्छ करण्यासाठी कधीही पेपर टॉवेल किंवा खडबडीत कापड वापरू नका. फक्त मायक्रोफायबर कापडाचा वापर करा. जर काचेवर जास्त डाग असतील, तर त्यावर थोडे पाणी शिंपडून २ मिनिटे थांबा आणि मग हलक्या हाताने पुसा.

7 / 8

ओले पॅडिंग आणि हेल्मेट कधीही थेट कडक उन्हात किंवा हेअर ड्रायरने वाळवू नका. कडक उष्णतेमुळे हेल्मेटमधील ईपीएस (EPS) लाईनर खराब होऊ शकतो. पॅडिंग पंख्याखाली किंवा सावलीत नैसर्गिकरित्या सुकू द्या.

8 / 8

हा संपूर्ण भाग पूर्णपणे कोरडा झाल्याशिवाय हेल्मेट एकत्र जोडू नका, अन्यथा पुन्हा कुबट वास येऊ शकतो. हे सर्व भाग पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित जागेवर बसवा. यानंतर तुम्ही तुमचे हेल्मेट पुन्हा नव्याप्रमाणे वापरु शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us