
अंतराळातलं विश्व हे फारच अजब असतं. इथे कधी काय होईल हे सांगता येत नाही. गुरुत्वाकर्ष शक्तीचा अभाव असल्याने तिथे प्रत्येक काम फार लक्षपूर्वकच करावे लागते. अंतरालवीरांनी एखादी चुक केली तर त्याचे मोठे आणि गंभीर परिणाम असू शकतात.

कारण पृथ्वीवर आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो, तसेच जीवन किंवा रोजची दिनचर्या अंतराळात नसते. दरम्यान, अंतराळात एखादे बाळ जन्माला आले तर ते कसे असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या.

अगोदर सांगितल्याप्रमाणे अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसते. तुमच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या विकासासाठी या गुरुत्वाकर्षण शक्तीची फार गरज असते. मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये जन्मलेल्या मुलाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

गुरुत्त्वाकर्षण नसल्यामुळे अंतराळात जन्मलेल्या मुलाची हाडे ठिसूळ असू शकतात. तसेच त्याच्या स्नानूंचाही विकास पुरेसा न होण्याची शक्यता असते. अंतराळात जन्मलेल्या बाळ्याच्या मेंदूपर्यंत रक्त पुरेशा प्रमाणात न पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाच्या डोक्याचा विकासही योग्य पद्धतीने न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंतराळात जन्मलेल्या बाळाच्या पाठीचा कणा सामान्य माणसांच्या तुलनेत जास्त लांब असू शकतो. अंतराळात जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकार शक्तीही पृथ्वीवर जन्मलेल्या बाळाच्या तुलनेत कमकुवत असू शकते. अंतराळातील कॉस्मिक रेडएशनमुळे अंतराळात जन्मलेल्या बाळाच्या जनुकांत बदल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात त्याला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.