
बॉलिवूनडमध्ये चर्चेत असणारे अजून एक कपल म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद

सबा आणि ह्रतिक अनेक वेळा ते सोबत फिरताना किंवा डिनर डेटवर जाताना दिसतात

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने नुकताच 1 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी हृतिकने खास फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सबाच्या वाढदिवसानिमित्त हृतिकने सबासोबतचे काही क्षण असलेले फोटो शेअर केले आहे

हृतिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सबा आणि त्याचे अनेक फोटो रोमँटिक आणि कोझी पोझ असलेले फोटो पाहायला मिळतात.

एका फोटोमध्ये सबाने हृतिकला घट्ट मिठी मारल्याचं दिसत असून दोघेही कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहेत.

तर, एका फोटोमध्ये ते दोघे सायकलिंग करणे एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक फोटोंमध्ये हे कपल सेल्फी घेताना आणि फिरताना दिसत आहे

सबा आणि हृतिकने त्यांनी एकत्रित घालवलेल्या क्लालिटी टाईम फोटोज हृतिकने शेअर केले आहेत .एवढचं नाही तर त्यांने या फोटोंवर 'धन्यवाद सबा' असं कॅप्शन देतं तिला शुभेच्छाही दिल्या आहेत