डी-मार्ट ग्राहकांसाठी मोठी बातमी, किराणा आणि घरगुती वस्तूंवर मोठी ऑफर, होईल मोठी बचत
जर तुम्ही देखील दैनंदिन वापरातील किराणा किंवा घरगुती वस्तू डी-मार्टमधून खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या डी-मार्टमध्ये किराणा खरेदीवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुमची मोठी बचत होऊ शकते.

महागाईच्या काळात घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहक नेहमीच किफायतशीर खरेदीच्या शोधात असतात. अशा ग्राहकांसाठी D-Mart ने दैनंदिन वापरातील अनेक किराणा आणि घरगुती वस्तूंवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत.

ज्यामध्ये तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मसाले, स्वच्छता उत्पादने तसेच वैयक्तिक निगा राखण्यासाठी लागणाऱ्या वस्तींवर सवलती मिळत असल्याने ग्राहकांना मासिक बजेटमध्ये मोठी बचत करण्याची संधी मिळू शकते.

दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले तांदूळ, गहू, रवा, पोहे, तांदळाचे विविध प्रकार आणि इतर धान्ये किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ यांसारख्या विविध डाळींवर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत.

तसेच सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, मोहरी आणि इतर खाद्यतेलांच्या विविध ब्रँड्सवर सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीच्या तेलाची खरेदी कमी किमतीत करता येईल. हळद, तिखट, धणे, जिरे, गरम मसाला तसेच इतर मसाल्यांच्या उत्पादनांवरही आकर्षक दर उपलब्ध आहेत.

बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स, चहा, कॉफी आणि पेयांवर आकर्षक सवलती उपलब्ध असून नियमित वापराच्या वस्तूंमध्ये ग्राहकांना चांगली बचत करता येणार आहे. या ऑफर्स, सवलती आणि उत्पादनांची उपलब्धता ही प्रत्येक D-Mart स्टोअरनुसार किंवा कालावधीनुसार बदलू शकते. खरेदी करण्यापूर्वी संबंधित स्टोअरमध्ये किंवा अधिकृत माहितीची खात्री करून घेणे उचित ठरेल.