
पुण्यातील आझम कॅम्पस येथे कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आझम कॅम्पसमध्ये शेकडो विद्यार्थिनी हिजाब घालून सहभागी झाल्या होत्या. यावेळी आझम कॅम्पसच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

हिजाब प्रकरणावरून संपूर्ण देशभारात सुरु असलेले राजकारण थांबावावे अशी मुख्य मागणी या मागणीसाठी शहरातील आझम कॅम्पसमध्ये महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

हिजाब परिधान करणे हा आमचा अधिकार आहे. आमच्या हिजाब घालण्याने कुणालाही समस्यां नसावी. हिजाबसोबत छेडछाड करण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही संविधानाच्या सोबत छेडछाड करत आहात अशी भावना तरुणीनी व्यक्त केली आहे.

हिजाब घालणे हा आमचा अधिकार व कर्तव्य आहे, ते कर्तव्य आम्ही पाळणार अशी भूमिका यामध्ये सहभागी झालेल्या तरुणींनी घेतली होती.

कुला जमाती तलजीम पुणे या संस्थेच्या वतीने या आझम कॅम्पसयामध्ये या महासभेचे आयोजन करण्यात आले होते.