
दिल्लीमध्ये मार्च महिन्यात हादरवून टाकणारं हत्याकांड घडलं होतं. एका महिलेची हत्या करून तिला दादरीमध्ये गुंडाळून नाल्यात फेकून देण्यात आलं होतं.

हत्या झालेल्या महिलेचं नाव सीमा सिंह असं आहे. या महिलेचा मृतदेह 15 मार्च रोजी पोलिसांनी ताब्यात घेतला होता. दरम्यान, या प्रकरणातील गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी महिलेच्या नाकातील 'नोज पिन' फार महत्त्वाची ठरली आहे.


महिलेची ओळख पटल्यानंतर पोलीस या हत्येच्या मुळाशी जाऊन पोहोचले आहेत. या महिलेची हत्या त्याच्या नवऱ्यानेच केली आहे. आरोपीचे नाव अनिल कुमार असून त्याने 11 मार्च रोजी महिलेची गळा दाबून हत्या केली होती. नोकराला सोबतीला घेत त्याने हे कृत्य केले होते.

या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तापासादरम्यान आरोपी अनिल एका दुसऱ्या महिलेसोबत राहात असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर पोलिसांचा अनिलवर संशय बळावला होता. घरातून फरार झाल्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेसोबत संसार थाटला होता. आता पोलिसांनी अनिल आणि त्याच्या नोकराला ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.