
सोलापुरात खुनासोबतच आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. नवऱ्याने आपल्या बायकोला नेमकं का मारलं आणि स्वत: आत्महत्या का केली? असे विचारले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

इथे एका पतीने आपल्या पत्नीचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून केला आहे. विशेष म्हणजे बायकोचा खून करून पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पत्नीने आपल्या पत्नीचा खून नेमका का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

गोपाळ लक्ष्मण गुंड आणि गायत्री गोपाळ गुंड अशा दोघा पती-पत्नींची नावे आहेत. गोपाळ गुंड याने आपल्या बायकोचा चार्जरच्या वायरने गळा आवळत खून केला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. असे असताना नवऱ्याने बायकोचा खून करून स्वत: आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)