रेल्वे प्रवास महागला, जनरल ते एसीपर्यंत झळ, पाहा नेमकी किती झाली भाडेवाढ
भारतीय रेल्वे मेल-एक्सप्रेसच्या भाड्यात केली आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच चाट लागणार आहे. पाहा नेमके काय घडले आहे.

Railway Ticket Hike: जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला आता चांगलाच चाट लागणार आहे. भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन भाडे नवी वर्षांच्या काही दिवस आधीच २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आधी पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.
रेल्वेच्या भाड्यात काय बदल ?
रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या भाडे स्ट्रक्चर नुसार ऑर्डीनरी क्लासमध्ये २१५ किलोमीटरच्या प्रवासाठी कोणतीही दरवाढ केलेली नाही. म्हणजे कमी अंतराच्या प्रवासासाठी कोणताही परिणाम होणार नाही. परंतू जर २१५ किलोमीटरहून जास्त अंतर असेल तर भाडे वाढणार आहे.
ऑर्डिनरी क्लास: १ पैसे प्रति किलोमीटरची वाढ
मेल/एक्सप्रेस (नॉन-AC आणि AC): 2 पैसे प्रति किलोमीटरची वाढ
| प्रवासाचा प्रकार | अंतर | वाढीचा नियम | एकूण वाढ |
|---|---|---|---|
| ऑर्डिनरी क्लास | 215 किमीपर्यंत | कोणतीही वाढ नाही | 0 |
| ऑर्डिनरी क्लास | 215 किमीपेक्षा जास्त | 1 पैसा प्रति किमी | अंतरानुसार |
| मेल/एक्सप्रेस नॉन-AC | 215 किमीपेक्षा जास्त | 2 पैसा प्रति किमी | अंतरानुसार |
| मेल/एक्सप्रेस AC | 215 किमीपेक्षा जास्त | 2 पैसा प्रति किमी | अंतरानुसार |
याचा थेट परिणाम लांबच्या प्रवासावर पडणार आहे.
रेल्वेचा होणार मोठा फायदा
रेल्वे भाड्यात झालेली वाढीमुळे भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात चांगलीच वाढ होण्याची आशा आहे. रेल्वेच्या अंदाजानुसार या निर्णयामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांहून अधिकची कमाई होऊ शकणार आहे. उदाहरणार्थ जर कोणता प्रवासी नॉन-AC ट्रेनने ५०० किलोमीटरचा प्रवास करत असेल तर त्याला सध्या भाड्याच्या तुलनेत १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
दिल्ली ते पाटणा: किती वाढणार भाडे ?
दिल्ली ते पाटणा हे अंतर सुमारे १००० किलोमीटर आहे. आतापर्यंत DBRT राजधानी ट्रेनचे थर्ड एसीचे भाडे सुमारे २१९५ रुपये ( समजा ) होते. आता २६ डिसेंबर २०२५ नंतर २ पैशाच्या प्रति किलोमीटर वाढ लागू झाल्यानंतर एकूण भाड्यात २० रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे दिल्ली ते पाटणा या ट्रेनचे तिकीट आता आधीपेक्षा महाग होणार आहे.
दिल्ली ते मुंबईचा प्रवास महागणार
दिल्ली ते मुंबईते अंतर सुमारे 1386 किलोमीटर आहे. आता सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसच्या 3AC चे भाडे सुमारे ३१८० रुपये आहे. नव्या नियमानुसार आता २ पैसे प्रति किमीच्या वाढीमुळे यात सुमारे २७ रुपयांची वाढ होणार आहे. यानंतर दिल्ली ते मुंबईचे तिकीट दर वाढून सुमारे ३,२०७ रुपये होणार आहे.
या वर्षी दुसऱ्यांदा झाली भाडेवाढ
यंदा पहिल्यांदा रेल्वेने भाडेवाढ केलेली नाही. याआधी १ जुलै २०२५ मध्ये देखील ट्रेनच्या भाड्यात वाढ झाली होती. त्यावेळी देखील मेल आणि एक्सप्रेसच्या ट्रेनच्या भाड्यात १ पैसे प्रति किलोमीटर, तर एसी क्लासमध्ये २ पैसे प्रति किलोमीटरची वाढ झाली आहे.
