FD Rates : दिवाळीआधीच ग्राहकांना गिफ्ट! या बँकेकडून फिक्स डिपॉजिटच्या व्याज दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

fixed deposit rates : एका खासगी बँकेने दिवाळीआधी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या बँकेने फिक्स डिपॉजिटच्या दरात वाढ केली आहे. जाणून घ्या नवीन दर

| Updated on: Oct 31, 2026 | 1:31 PM
1 / 5
आयसीआयसीआय बँकेने दिवाळीआधी एक मोठी घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेने तीन कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने या व्याजदरात 10 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे.

आयसीआयसीआय बँकेने दिवाळीआधी एक मोठी घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेने तीन कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने या व्याजदरात 10 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे.

2 / 5

आयसीआयसीआय बँकेने या निर्णयानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याजदर हे 7.20 टक्के इतके निश्चित केले आहेत. तर सामान्य नागरिकांसाठी हे व्याजदर कमीत कमी 6.60 टक्के इतके केले आहेत.

3 / 5

या खासगी बँकेने काही ठारविक वेळेच्या एफडीच्या व्याजदरात बदल केले आहेत. 2 वर्ष एक दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडीचा व्याजदर आता 6.55 टकके इतका निश्चित करण्यात आला आहे. याआधी व्याजदर हा 6.45 टक्के होता. म्हणजे बँकेने व्याजदरात 10 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे.

4 / 5

3 वर्ष एक दिवस ते 5 वर्षांच्या एफडीवर बँकेने 6.60 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या व्यतिरिक्त 5 वर्ष एक दिवस ते 10 वर्षांच्या एफडीच्या व्याजदरातही वाढ केली आहे. या कालावधीची एफडी करणाऱ्यांना 6.60 टक्के व्याज मिळणार आहे. याआधी 6.50 टक्के व्याज मिळत होते.

5 / 5

बँक 7 ते 45 दिवसांच्या एफडीसाठी बँक 2.75 टक्के व्याज देत आहे. 46 ते 90 दिवसांच्या एफडीसाठी बँकेने 4 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us