
पहिले लग्न झाले असेल तर घटस्फोट न घेताच जर कोणी दुसरे लग्न केले तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. फक्त गुन्हाच नाही तर अटकही होऊ शकते. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 494 अंतर्गत तो दंडनीय गुन्हा आहे.

IPC कलम 494 नुसार, जर एखाद्या पुरूषाने पत्नीला घटस्फोट न देताच दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मुळात म्हणजे कायद्यानुसार, घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणे गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि त्याने प्रकरणाचा निकाल न लागताच लग्न केले तो देखील गुन्हाच आहे.

तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे. घटस्फोटाशिवाय जर तुम्ही लग्न केले तर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येईल.

तुम्ही धर्म बदलून जरी दुसरा विवाह केला तरीही तुमच्यावर 494 अंतर्गत कारवाई होते. यामुळे दुसरा विवाह करताना 100 वेळा विचार करणे आवश्यक आहे.