
अयोग्य आहारामुळे अनेकांना कॉलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.रक्तवाहिन्यात चरबीचे प्रमाण साठल्याने कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरु होतो. जेव्हा कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयाशी संबंधित आजार वाढतात. तुम्ही सहज उपलब्ध होणाऱ्या आवळा ज्यूसचा वापर करुन कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.

आवळ्यात व्हीटामिन्स सी,फायबर, मिनरल्स आढळते. शरीरातील रक्ताभिसरण आवळा ज्यूसने नीट होते. त्यामुळे ब्लडप्रेशरचा त्रास कमी होतो. आवळा ज्यूस प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.


आवळ्याचा ज्यूस दररोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने कॉलेस्ट्रॉलचे नियंत्रण होते. त्यामुळे रक्तात ब्लड क्लॉट होण्याची शक्यता देखील कमी होते. आवळा नुसता चावून खाल्ला तरी याचा फायदा शरीराला होत असतो

Disclaimer : येथे दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.उपचार आणि योग्य माहितीसाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा