
आम्ही बोलतोय 'इक्कीस' चित्रपटाचे लीड स्टार्स अगस्त्य नंदा आणि सीमर भाटियाबद्दल. दोघांनी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलय. फिल्म आणि त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

अगस्त्यने या चित्रपटाआधी ओटीटीवर आर्चीजमध्ये काम केलय. पण सिमरचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. फार कमी लोकांना माहितीय की, सिमर बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या बहिणीची मुलगी आहे.

श्रीराम राघवन यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेला 'इक्कीस' चित्रपट 1 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. या फिल्मममध्ये अगस्त्य आणि सिमर शिवाय धर्मेंद्र, जयदीप अहलावत सारख्या कलाकारांनी जबरदस्त अभिनय केलाय.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर फिल्मच्या स्टारकास्टची फी समोर आलीय. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अगस्त्यला 70 लाख रुपये मिळालेत. सिमरनबद्दल बोलायचं झाल्यास तिला फक्त 5 लाख रुपये मिळालेत. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये होतं.

चित्रपटातील अन्य कलाकरांच्या फी बद्दल बोलायचं झाल्यास, धर्मेंद्र यांना 20 लाख रुपये आणि जयदीप अहलावत यांना 50 लाख रुपये मिळाले आहेत. हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला.