
'धुरंधर' या चित्रपटाचा दुसरा भाग पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये रिलीज होणार असून तो पाहण्यास प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हमजाचं पुढे काय होतं, बडे साब कोण हे आणि असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. अवघ्या 2 महिन्यात या चित्रपटाने प्रचंड गल्ला कमावला असून बॉक्स ऑफीसवरही त्याची क्रेझ आहे. सर्वच कलाकारांची कामं अव्वल असून प्रत्येकाची क्रेझ आहे. पण हाच चित्रपट जर मराठीत आणि तोही 80 च्या दशकात आला असता तर ? कोणत्या कलाकाराने कोणती भूमिका साकारली असती ?

रेहमान डकैत, हमजा अली मजारी, जमील जमाली यांच्या भूमिकेत कोणते कलाकार , आणि ते कसे दिसले असते ? सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरच्या पेजवर याबद्दल एक व्हिडीओ व्हायरला झाला असून त्यात प्रत्येकाच्या भूमिकेत मराठी अभिनेते दाखवण्यात आले आहेत

अजय सन्याल- पहिल्या भागात अजय सन्यालच्या भूमिकेता आर. माधवन दिसला होता. ही भूमिका रॉ एजंट अजित डोवाल यांच्या आयुष्यावर असल्याची चर्चा आहे. मराठीत हा चित्रपट आला असता तर डॉ. श्रीराम लागू हे अजय सन्यालच्या भूमिकेत दिसले असते असं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

जमील जमाली - 'धुरंधर' मध्ये अभिनेते राकेश बेदी यांनी पाकिस्तानी राजकारणी जमील जमाली (Jameel Jamali) ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हे पात्र पाकिस्तानचे नेते नबील गबोल (Nabil Gabol) यांच्यावर आधारित असल्याचे सांगितले जाते. मराठीत हा चित्रपट आला असता तर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी या भूमिकेत बहार आणली असती.

डोंगा - धुरंधर'मधील 'डोंगा' (Naveen Kaushik) हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलंय. अभिनेता नवीन कौशिकने साकारलेला, 'रहमान डकैत'चा राईट हँड डोंगा, त्याच्या संतापजनक स्वभावामुळे आणि अभिनयामुळे प्रभावी ठरला. मराठीतील धुरंधरमध्ये प्रशांत दामले हे या भूमिकेत चपखल दिसले असते,असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

चौधरी अस्लम खान- 'धुरंधर' चित्रपटात संजय दत्तने साकारलेली भूमिका ही सिंध पोलीस चौधरी अस्लम यांच्या आयुष्यावर प्रेरित आहे, असे म्हणतात. मराठीत ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीच खणखणीत साकारली असती ना..

मेजर इक्बाल - धुरंधरमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल याने ‘मेजर इक्बाल’ ही आयएसआय (ISI) प्रमुखाची खलनायकी भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याची थंड नजर, हास्य, क्रूर वागणूक, गुप्तहेर पकडल्यालवर त्याने केलेली हालत पाहून कोणाच्याहीअंगावर काटा येतो. मराठीत पिक्चर आला असता तर अभिनेते रमेश भाटकर हे या भूमिकेत नक्कीच उत्तम दिसले असते.

रेहमान डकैत - धुरंधर' या हिंदी चित्रपटातील रहमान डकैत हे पात्र पाकिस्तानातील कराची येथील लियारी भागातील कुख्यात ड्रग लॉर्ड आणि गँगस्टर 'सरदार अब्दुल रहमान बलोच' याच्या वास्तविक जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. अभिनेता अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकैत कोणी विसरू शकेल असं वाटत नाही. पण मराठीत,80 च्या दशकात हाँ चित्रपट आला असता तर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना या भूमिकेत पाहणं खरंच पर्वणी ठरली असती.

हमजा अली मजारी - 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंगने 'हमजा अली मजारी' (खरे नाव जसकीरत सिंग रांगी) या भारतीय गुप्तहेराची (Spy) भूमिका साकारली आहे. तो पाकिस्तानमधील लियारी भागात घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करतो. त्याच्या अभिनयाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच पण मराठीत जर हा चित्रपट बनला असता तर या भूमिकेत एव्हरग्रीन अभिनेते रवींद्र महाजनी नक्कीच शोभून दिसले असते.