Dr. Babasehab Ambedkar : मी अशा धर्माला मानतो जो… महामानवाचे हे विचार तुमचं आयुष्य बदलून टाकेल

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा (Dr. Babasaheb Aambedkar) आज 68 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात.विख्यात कायदेतज्ज्ञ, भारताच्या संविधानाचे जनक असलेल्या या महामानवाने आपल्या आचरणातून, वागण्या-बोलण्यातून पुढल्या असंख्य पिढ्यांसाठी मोलाचे विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही विधान समाज परिवर्तनास कारणीभूत ठरली. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जीवनात बदल घडवणारे बाबासाहेबांचे काही मौल्यवान विचार आपण जाणून घेऊया.

| Updated on: Dec 06, 2024 | 8:19 AM
1 / 8
 मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.

मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.

2 / 8
जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

3 / 8
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरता आहे.

माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरता आहे.

4 / 8
भाग्यावर , नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी ( मनुष्याने) आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे.

भाग्यावर , नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी ( मनुष्याने) आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे.

5 / 8
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

6 / 8
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

7 / 8
एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका

एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका

8 / 8
ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो.

ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो.